योग शिकायचे म्हणजे काय शिकायचे ?

योग शिकायचे म्हणजे काय शिकायचे ?

योगाला आता अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. योगाला दिन अच्छे आले असले तरी ज्या पद्धतीने अलीकडे योग शिकवला जात आहे त्याचे स्वरूप “अच्छे” नाही. आज योगाच्या नावाने जे काही शिकवले जात आहे ते विडंबन आहे. शारीरिक पातळीवर तात्पुरता परिणाम करणारा तो एक Jimnyastic चा प्रकार आहे. जर लोकांना खरेच योग समजला असता आणि तो त्यांनी आचरणात आणला असता तर खालील गोष्टी दिसायला हव्या होत्या. एव्हाना ….

परंतु तसे काही होतांना दिसत नाही. उलट सगळीकडे अराजकता वाढतांना दिसते आहे. म्हणजेच योगाने, जी शांती आणि समाधानाचे परिणाम दिसायला हवे होते ते कुठेच दिसत नाहीत. योग शिक्षकही व्याधीग्रस्त आहेत. आपापल्या योग संघटना बनवून शासनाकडे न्यायहक्क मागत आहेत. सगळे कसे विपरीत दिसत आहे.

योगातून वास्तविक वैराग्ययुक्त आचरण दिसायला हवे होते, ते कुठेच दिसत नाही. याचा अर्थ असा होतो, वास्तवात जे योगाचे स्वरूप आहे ते बाहेर आलेच नाही. ते सोयीनुसार वळवण्यात आले. भौतिक जीवन अधिक सुखमय करण्यासाठी योगाचा उपयोग होतांना दिसतो आहे. योगामुळे आरोग्यप्राप्ती होते, हे माहीत असूनही रोगांवर उपचार करण्यात सगळे गुंतले आहेत. उत्तम आरोग्याची व्याख्याच आज बदलून गेली आहे. शारीरिक फिटनेस ला लोक आरोग्य समजू लागले आहेत. कशाला हवे असते बरे हे आरोग्य? आज लोक योगाकडे का येत आहेत? त्याची कारणे अगदी उथळ आहेत. योग त्यांना खालील कारणासाठी शिकायचा आहे…
• माझे पोट निरोगी हवे; का तर मला अधिकाधिक चमचमीत खायचे आहे.
• माझी ज्ञानेद्रीये उत्तम का हवीत कारण त्यातून मला अधिकाधिक विषय सेवन करायचे आहेत.
• अधिकाधिक भोग घेण्यासाठी मला योग हवा आहे.
• मला सुंदर दिसायचे आहे.
• मला माझे वजन कमी करायचे आहे.

आणि तथाकथित योग शिक्षक व योगसंस्था वरील घटक डोळ्यासमोर ठेऊन निर्माण होणा-या व्याधींचा चौफेर विचार करून, पुराणातील शब्द प्रामाण्य शोधण्यात गुंतले आहेत. बुद्धीचा कीस काढून योगातील नवीन नवीन उपचार तंत्रे शोधत आहेत. आयुर्वेदाने सुद्धा आता दिशा बदलून होणाऱ्या रोगावरच विचार सुरु केले आहेत. योग ईंस्टीट्युट सांताक्रूझ ने शंभर वर्षापूर्वी ही शक्यता वर्तवली होती.

सामान्य माणसापर्यंत योग आणणे सोपे नाही. एक तर त्यासाठी सामान्य माणसाला असामान्य व्हावे लागेल. आणि हे कार्य सामान्य योगशिक्षकाला जमणे शक्य नाही. जेव्हा असे काही जमत नाही तेव्हा संधिसाधू निर्माण होतात. हा इतिहास आहे. सामान्य माणसे मुळातच अज्ञानात खितपत पडलेली आहेतच. त्यात योगाच्या नावाने काहीही शिकवण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. इतर धर्म व पंथांचेही तेच चालू आहे. अध्यात्मातील मोठमोठ्या शब्दांची निव्वळ चलती आहे. त्याचा ना शिकवणाऱ्याला गंध, ना शिकणाऱ्याला!

आनंद विहार आश्रम गेली दोन दशके क्लासिकल योगाचा प्रसार रत्नागिरी जिल्ह्यात करीत आहे. सामान्य माणसापर्यंत योगाच्या माध्यमातून ज्ञान मार्ग नेण्याचे मुख्य उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन आश्रम कित्येक वर्षे कार्य करीत आहे. त्यासाठी खेड्यातून आश्रमाने योग प्रकल्प उभे केले आहेत. लोकांना ज्ञान मार्गाची ओळख व्हावी म्हणून तीन मार्गाने आश्रम प्रयत्नशील आहे.
१) रोज सकाळी विनामुल्य योग परिसंवाद – हा वर्ग सर्वांसाठी विनामुल्य असतो. हा वर्ग कुणाला attend करायचा असेल त्यांना खाली दिलेल्या फोनवर विनंती message पाठवता येतो. त्यांना लिंक पाठवली जाते.
२) योगातुन आरोग्य योग ग्रुप :- हा योग प्रेमी व योगसाधकांचा ग्रुप आहे. योगामध्ये आवड असणाऱ्या कुणालाही या ग्रुप मध्ये येता येते. ह्या ग्रुप वर योगशास्त्राचे शास्त्रीय स्वरूप सांगणारे लेख वाचायला मिळतात.
३) योगातुन आरोग्य हे आश्रमाचे You-tube च्यानेल आहे.

ह्या तिन्हींच्या माध्यमातून Yoga institute Santaruz चे संस्थापक श्री योगेंद्रजिंची classical विचार प्रणाली सामान्य जनांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आनंद विहार आश्रम गेली २२ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात करीत आहे. मंडणगड तालुक्यातील तळेघर ह्या निसर्गरम्य लहानशा गावी आश्रमाचे प्रमुख कार्यालय आहे. आश्रमापासून दूर असणाऱ्या वाचकांसाठी उद्यापासून नियमित योगावर आधारित लेखमाला सुरु होत आहे. अशा आहे कि वाचकांना ती आवडेल. विशेषता योगप्रेमी व योगासाधकांना ती खूप मार्गदर्शक ठरेल. असा विश्वास आहे.

श्री. दिनेश पांडुरंग पेडणेकर (सर)

Exit mobile version