राजापूर – (प्रमोद तरळ) कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापुर (ग्रामीण) अणसुरे जैतापूर विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांची महत्वपूर्ण सभा बुधवार दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी स. १० वाजता कोंबे स्टाॅप येथे विभागप्रमुख श्री तुकाराम मोंडे यांच्या घरी संपन्न झाली.
सदर सभेस विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते,सदस्य (एकूण २२) समाज बांधव उपस्थित होते.ग्रामीण शाखा उपाध्यक्ष सन्मा.श्री.सत्यवान कणेरी , ग्रामीण शाखा सदस्य सन्मा.श्री.रमेश राणे ,सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष (बबन) तांबे उपविभाग प्रमुख श्री.जयवंत नाचणेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदकुमार मिरगुले, श्री.भरत मिरगुले, श्री.नारायण मिरगुले, श्री.स्वप्निल सोगम, सौ.सुजाता तांबे ताई, श्री.अनिल तिर्लोटकर, श्री.संतोष लासे, श्री.हरिश्चंद्र दसूरी, श्री.दिलीप बर्गे, श्री.नवनाथ शेलार, श्री.विलास कातकर, श्री . अनिल तिर्लोटकर, श्री.वसंत वाईम, श्री.विजय मोर्ये, श्री.प्रथमेश बावकर, श्री.सुरेश घाडी, श्री.वैभव बावकर , श्री मोतीराम नाचणेकर उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचलन सन्मा.श्री.सत्यवान कणेरी सर आणि श्री.जयवंत नाचणेकर यांनी केले.
या सभेत मागील कामकाजाचा आढावा घेण्यात आला .अणसुरे विभागामध्ये संघटना बांधण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
अणसुरे -जैतापूर विभागातील प्रत्येक गाव वाडीतील दोन कार्यकर्ते कार्यकारिणीसाठी नावे घेऊन दिनांक १०/१२/२०२३ रोजीच्या सभेत कार्यकारिणीसाठी पदाधिकारी निवड करण्यात येईल, कुणबी डेटा सर्वेक्षण फाॅर्म भरण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई मातृसंस्थेचे शाखा तालुका राजापूर ग्रामीण भागातील सभासद नोंदणी करण्यासाठी समाज बांधवांना माहिती देण्यात आली. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर दिनदर्शिका -२०२४ साठी जाहिरात देण्या संदर्भात श्री.तुकाराम मोंडे यांनी माहिती दिली.ओबीसी आरक्षण संदर्भात श्री.जयवंत नाचणेकर यांनी माहिती दिली.
विभागाची संघटना बांधणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी श्री.नंदकुमार मिरगुले,श्री.संतोष लासे, श्री.भरत मिरगुले, श्री.नारायण मिरगुले, श्री.संतोष तांबे आणि उपस्थित सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद दिला.
उपस्थित सर्व समाज बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रथमच सभेला सर्व उपस्थित समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.आणि सभा उत्तम प्रकारे खेळीमेळीने पार पडली.आणि पुढील सभेची तारीख १०/१२/२०३ निश्चित करण्यात आली. सभेचा समारोप श्री.रमेश राणे यांनी सर्वांचे आभार मानून केले.
कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापूर (ग्रामीण) अणसुरे जैतापूर विभागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची सभा संपन्न… .
