ग्रामपंचायत कुंवारबावचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न…!

माजी आमदार, भाजपा नेते बाळासाहेब माने, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांची विशेष उपस्थिती.

रत्नागिरी तालुक्यातील लोकहितार्थ काम करणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या ग्रामपंचायत कुंवारबावचा रौप्य महोत्सवी सोहळा सरपंच व धडाडीच्या भाजपा कार्यकर्त्या सौ. मंजिरी पाडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार तथा रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने तसेच जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थ व स्थानिक पुढाऱ्यांशी चर्चा केली. ग्रामपंचायतीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख गायिका कु. ईशानी पाटणकर हिच्या सदाबहार गाण्यांच्या मैफिलीची मेजवानी ग्रामस्थांना देण्यात आली. या कार्यक्रमाचा शुभारंभ मा. श्री. बाळासाहेब माने यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आला. ईशानीच्या सुस्वर गायनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

संपूर्ण कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकशक्ती कोणताही कार्यक्रम यशस्वी करू शकते याचा आदर्श वस्तुपाठ कुंवारबावमधील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. सरपंच सौ. मंजिरी पाडळकर यांनी उत्कृष्ट नेतृत्व करत आपल्यासोबत सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांना घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. स्वातंत्र्याच्या अमृत काळात ग्रामपंचायत कुंवारबाव नवी भरारी घेण्यासाठी सज्ज असून लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे हा विश्वास मान्यवरांच्या उपस्थित ग्रामस्थांना देण्यात ग्रामपंचायत प्रशासन यशस्वी ठरले आहे.

मा. श्री. बाळासाहेब माने, श्री. सतेज नलावडे, सौ. मंजिरी पाडळकर, गायिका कु. ईशानी पाटणकर यांच्यासोबत ग्रा. पं. उपसरपंच श्री. नरेश विलणकर, सदस्या सौ. अनुश्री आपटे, सौ. नेहा आपकरे, सौ. वैदेही दूधवडकर, सौ. साक्षी भुते, सौ. रंजना विलणकर, श्री. रमेश चिकोडीकर, श्री. जीवन कोळवणकर, श्री. गणेश मांडवकर, यांच्यासह अन्य आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी श्री. रसिक कदम, श्री. नितीश आपकरे, श्री. योगेश गराटे, सर्व माजी सरपंच, सोसायटी, मंडळ कार्यकर्ते, महिला मंडळ आणि बचत गटातील महिला, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समितीने सर्वांचे मनस्वी आभार मानले. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version