खा.अशोक नेते तेलगांना राज्यातील जिल्हा निर्मल येथे मन कि बात चे थेट प्रक्षेपण पाहतांना..
विजय शेडमाके
दि.२६ नोव्हेंबर २०२३
गडचिरोली : भारताचे यशस्वी आणि कर्तृत्व संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा लोकप्रिय “मन की बात” या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. माननीय पंतप्रधान आपल्या मन की बात मध्ये देशात सुरू असलेल्या विविध घडामोडी व लोकोपयोगी गोष्टी ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो अशा सर्व गोष्टी पटलावर आणून मौलाचं काम करत आज सुद्धा मोलाचे मार्गदर्शन माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी केले.
पंतप्रधानांनी मन कि बात मध्ये आजचा दिवस म्हणजे मौल्यवान दिवस म्हणजे ” संविधान दिन ” या संविधान दिनाच्या समस्त देशवासीयांना शुभेच्छा याप्रसंगी दिल्या. यावेळी खासदार अशोकजी नेते हे तेलंगणा राज्यातील निवडणूक संबंधीत निर्मल जिल्हयात व्यस्ततेत असतांना सुद्धा मन की बात चा कार्यक्रम पाहण्यात आले.