रत्नागिरी : कोकणात शेतकरी आता फवारणी आणि विविध बागायतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यात विमा भरायची तारीख 30 नोव्हेंबर, 2023 अशी असताना त्या साईटवर अनेक समस्या येत आहेत आणि नीटसा विमा भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
अनेक ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी नसल्याने तसेच स्मार्ट फोन बाबत माहिती नसल्याने या संदर्भात विमा भरण्यास विलंब होत असल्याचे श्री. राजेश सावंत आणि अॅड. ज्ञानेश पोतकर यांनी बांधकाममंत्री व भाजपाचे नेते श्री. रविंद्रजी चव्हाण येथे आलेले असताना ही बाब त्यांच्या कानावर घातली. त्यानुसार त्यांनी माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पीक विमा तारीख 15 डिसेंबर करण्याची विनंती केली त्यानुसार आता 3 नोव्हेंबर ही तारीख दिली असून शेतकर्यांनी तात्काळ विमा उतरवून घ्यावा किंवा जवळच्या महा इ सेवा केंद्रात जाऊन आपला विमा भरून घ्यावा. आम्ही पुढील तारीख वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी नमूद केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र