मौजे देवडे आणि वाडी अधिष्ठी ग्रामविकास मंडळ, मुंबईचा ३९ वा वर्धापन दिन संपन्न….

संगमेश्वर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे देवडे आणि वाडी अधिष्ठी ग्रामविकास मंडळ, मुंबई. या मंडळाला दिनांक ०२.१२.२०२३ रोजी ३९ वर्ष पूर्ण झाली. या मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. दयानंद लक्ष्मण चिंचवलकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक ०३.१२.२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता कै. मोहन नाईक सभागृह, नायगाव लेबर कॅम्प, दादर मुंबई. येथे संपन्न झाला.
मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे माजी कार्याध्यक्ष व मालाड मुंबईचे माजी नगरसेवक श्री. आत्माराम चाचे व नायगाव वडाळा मुंबईचे माजी नगरसेवक श्री मुकुंद पड्याळ साहेब हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मंडळाचे माजी अध्यक्ष व सरचिटणीस श्री राजाराम चिंचवलकर हे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. सुरेश बेर्डे, श्री. सोमजी कांगणे, श्री विजय तळेकर, श्री. प्रमोद साबळे, मंडळाचे सल्लागार श्री वामनशेठ बेर्डे व मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्री दीपक कांगणे हे उपस्थित होते. सर्वांनी आपल्या भाषणात बोलताना मंडळाच्या जडणघडणीबाबत वक्तव्य केले.
वर्धापन दिना निमित्ताने मंडळाचे सर्व माजी पदाधिकारी तसेच गावातील सर्व वाडीमंडळाचे अध्यक्ष यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच मुंबईतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शैक्षणिक निधीसाठी प्रकाशित करण्यात येत असलेल्या दिनदर्शिका – २०२४ चे प्रकाशन करण्यात आले. व महिलांसाठी हळदीकुंकू तसेच खास महिलांसाठी “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे सादरीकरण सौ.सोनल सावंत मॅडम यांनी केले
या वर्षीच्या पैठणी विजेत्या ठरल्या सौ. पायल प्रवीण कांगणे व सेमी पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत सौ. कल्पना आदित्य डावल यांचे मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.
मंडळामार्फत देवडे गावची सुकन्या कुमारी आकांक्षा उदय कदम (आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू) हिला सन्मानित करण्यात आले.
गुणगौरव करण्यात आलेल्या विद्यार्थ्यां मधून कु. प्रेरणा दिलीप चिंचवलकर, कु. सार्थक विजय तळेकर आणि कु. केतन सिताराम कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करून मंडळाला शुभेच्छा दिल्या.
सदर वर्धापन दिन कार्यक्रमाला देवडे आणि वाडी अधिष्ठी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व महिला तसेच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.मंडळाच्या सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी मंडळाचे सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी चांगले सहकार्य केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र शेडगे व सूत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस श्री. लक्ष्मण वीर यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

Exit mobile version