भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांचे अभिवादन..

रत्नागिरी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री उदय सामंत यांनी अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील पवित्र संविधानाचा मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान असल्याचे पालकमंत्री म्हणाले. सिव्हील हॉस्पीटल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री श्री. सामंत यांनी पुष्पहार अर्पण करुन आणि पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातलं सगळ्यात चांगलं संविधान देशाला दिलेले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आमदार, खासदार, मंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो याची आम्हाला जाण आहे. जगातील सगळ्यात पवित्र संविधान देशाला दिलं. याचं मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान असल्याचेही यावेळी पालकमंत्री म्हणाले. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version