शासकीय रुग्णवाहिकेसाठी जिल्हा नियोजन निधी मधून निधी घ्या. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले मागणी..

रत्नागिरी : आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे. राजापूर तालुक्यामध्ये रायपाटन येथे 108 शासकीय रुग्णवाहिका अनेकदा उपलब्ध होत नाही अशी तेथील स्थानिकांचे म्हणणे होते. त्याबाबतीत काही तक्रारी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कडे करण्यात आल्या होत्या. या प्रश्नाबाबत माहिती घेण्यासाठी आणि यातून मार्ग काढा अशी विनंती करण्यासाठी सिव्हील सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांची जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सिव्हील सर्जन डॉ संघमित्रा फुले यांनी रुग्णवाहिका कमी आहेत. आणि आहेत त्यात डिझेल भरावे लागते त्यासाठी देखील निधी उपलब्ध होत नाही या अडचणी सांगितल्या.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावर बोलताना आरोग्य सुविधा ही माणसाची महत्त्वाची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही रुग्णाला आवश्यक असेल तेव्हा शासकीय रुग्णवाहिका मिळालीच पाहिजे. त्यासाठी इंधन खर्च असेल तर जिल्हा नियोजन निधी मधून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आपण करा असे राजेश सावंत यांनी फुले मॅडम यांच्याशी बोलताना सांगितले. साधारण यासाठी किती खर्च येईल याची माहिती आम्हाला देखील द्या आम्ही देखील यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मिळावा अशी मागणी करणार आहोत असे सांगितले.
रुग्णवाहिका उपलब्ध करा आणि त्यासाठी लागणारे इंधन खर्च यासाठी जिल्हानियोजन निधी मधून निधी उपलब्ध करा असे भाजपाच्या वतीने मागणी करण्यात आली ही मागणी पूर्ण झाल्यास रत्नागिरीतील सर्व तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होणार होईल. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह, सतेज नलावडे, राजन फाळके, मनोज पाटणकर, महेंद्र मयेकर, नितीन जाधव, दादा ढेकणे, मंदार मयेकर, राजू भाटलेकर,नंदु चव्हाण आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version