तळेकांटे भाजपच्या नूतन सरपंच यांना पुढील वाटचालीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिल्या शुभेच्छा.

रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत तळेकांटे ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरपंच पदी लोकांमधून निवडून आलेल्या सौ सुषमा संदीप बने आज सरपंच पदी विराजमान झाल्या. त्याबद्दल त्यांना भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी शुभेच्छा दिल्या व गावातील सर्व नागरीकांना सुखसुविधा पुरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. असे आश्वासन दिले व जीकाही मदत लागेल ती नक्कीच आपण करू असे आश्वासन दिले व कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता गावातील सर्व नागरिकांचे मनोभावे काम करा असे सांगितले     
              त्यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी दक्षिण संगमेश्वर मंडळ अध्यक्ष रुपेश कदम तालुका,जिल्हाचिटणीस संदीप बने, सरचिटणीस सचिन बांडांगळे,युवा मोर्चा मंडळअध्यक्ष संकेत कदम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रथमेश धामणस्कर, नूतन ग्रामपंचायत सदस्य श्री सांडीम व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी नूतन सरपंच यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version