अनेक वर्ष पासून माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते ते रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्ग मधे गेली ते आजही आपले भरपाईची वाट पाहत आहेत. असाच एक प्रकार म्हसळा येथे ज्येष्ठ नागरिक शरीफ हळदे यांचे सोबत घडला आहे. गरीब शेतकरी ची जागा मौजे सकलप स.नं १९/१ ही भूसंपादन करण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता व जागा मालकाला कोणताही मोबदला न देता माणगाव ते दिघे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. आज ही ते मोबदलाची वाट पाहत आहेत. वेळो वेळी अर्जाला केराची टोपली दाखवली गेली अखेर त्यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. दिनांक ०५ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकारी श्रीम. दीपा भोसले यांना लेखी अर्ज देऊन १५ दिवसात जर मोबदला मिळाला नाही तर मी उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन यांच्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे आणि या अर्जाची परत राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे, मा.श्री नितीनी गडकरी, मा. ना कु.अदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्रराज्य, मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी रायगड, मा. पोलीस अधीक्षक रायगड, मा. तहसीलदार म्हसळा यांच्या माहिती साठी व पुढील कारवाई साठी पाठवण्यात आलेली आहे.
- Home
- रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.
रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.
-
by saurabhsalvi26 - 103
- 0

Leave a Comment
Related Content
-
महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.
By Nilesh Akhade 2 weeks ago -
ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार..
By Nilesh Akhade 4 weeks ago -
नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याने रत्नागिरी भंडारी समाज बांधवांनी नितेश राणे यांचे केले अभिनंदन.
By Nilesh Akhade 4 weeks ago -
आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र तर्फे रक्षाबंधन सण भारतीय सैन्यासोबत उत्साहात साजरा..
By Nilesh Akhade 1 month ago -
-
हर्ष नागवेकर ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता 2025
By Nilesh Akhade 1 month ago