सांताक्रुझ ( वाकोला ) येथे १० डिसेंबर रोजी आयोजित मानवाधिकार परिचय रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद..

सांताक्रूझ – (प्रमोद तरळ) जगातील सर्व देशांमध्ये मानवाधिकार दिवस साजरा केला जातो. आपल्या अधिकारांसाठी आपणच आवाज उठवला पाहिजे, दुसरं कोणीही येणार नाही, असे महामानवांनी सांगितले होते.
आपल्याला आपल्या अधिकारासोबत परिचय करून देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मर्जी ( मेरे अधिकार,मेरी जिम्मेदारी) संघटनेच्या मार्फत आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने वाकोला विभागात मानवाधिकार परिचय रॅली चे नियोजन केले होते.
सदर रॅली खांडवाला कंपाऊंड येथून प्रारंभ होऊन, गावदेवी, मिलिंद नगर, दत्तमंदिर रोड, डिमेलो कंपाऊंड, लालबहादूर शास्त्री नगर, राम मंदिर, विवेकानंद नगर ( महासंघ) येथे संपन्न झाली. रॅली चे सूत्रसंचालन मर्जीचे महाराष्ट्र समन्वयक आणि जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर जाधव यांनी केले. मर्जी संघटनेचे प्रमुख मंगेश सोनावणे यांनी घोष वाक्यांनी सहभागी साथीचे मनोबल उंचावले आणि रॅलीची सूत्रे सांभाळली. शाहीर सुनील जैसवार यांनी त्यांच्या शाहिरी बाण्यातून गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवले आणि जनजागृती केली.
सामाजिक क्षेत्रात व्यसनमुक्ती वर काम करणाऱ्या SUPPORT संघटनेच्या ईजाज खान यांनी मार्गदर्शन केले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई उपनगर जिल्हा संघटीका दिशा कळंबे यांनी मार्गदर्शन केले. मुंबई युवा ग्रुपचे शैलेश कदम यांनी मार्गदर्शन केले. रॅली मध्ये महिला शक्तीचा जास्त सहभाग होता.
मुंबई विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक हणमंत वानोळे सर यांनी मार्गदर्शन केले.
मर्जी संघटनेचे समन्वयक प्रितेश नंदिवडेकर,ज्येष्ठ समन्वयक दीपक शिंदे, वंदना झेवियर्स, प्राप्ती कोळी, सागरिका जाधव, दिनेश रमण,युवा तुषार धिवरे यांनी आपले विचार जनसमुदाय समोर मांडले.
ही रॅली जनसामान्यांना त्यांच्या मानव अधिकाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी होती.

Exit mobile version