आ. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून लांजा डाफळेवाडी शाळेला संगणक प्रदान…

प्रमोद तरळ यांच्या प्रयत्नाने शाळा होणार डिजिटल…..

लांजा – (प्रतिनिधी) भाजपाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या २०२३ – २४ च्या स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्य वाटप ‘कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम’ या उपक्रमाच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा डाफळेवाडी या शाळेला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली यादव संगणक भेट देण्यात आला यावेळी शिक्षणतज्ज्ञ सौ.मानसी डाफळे उपस्थित होत्या.
‌. यावेळी राजापूर – लांजा, साखरपा‌ विधानसभा निवडणुक प्रमुख उल्का विश्वास विश्वासराव मॅडम, भाजपा लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, लांजा तालुका सरचिटणीस विराज हरमले, जिल्हा कमिटी सदस्य रविंद्र नारकर आदी मान्यवर उपस्थित होते
या शाळेतील विद्यार्थी हे गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दिपाली यादव यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सदर संगणक संच राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तरळ यांच्या प्रयत्नाने अजित यशवंतराव युवा मंच पुणे शहर सरचिटणीस प्रविणजी रामाणे यांच्या माध्यमातून ‌व रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा. अजित यशवंतराव यांच्या शिफारशीनुसार देण्यात आला

Exit mobile version