मुंबई – (प्रमोद तरळ) कोकण रेल्वेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली मात्र तरीही कोकणवासियांचे प्रवासा दरम्यान हाल काही संपेनात.ज्या महाराष्ट्र राज्यांने कोकण रेल्वेत सर्वाधिक २२% गुंतवणूक केली त्याला फक्त तीनच रेल्वे मिळतात,तर कमी गुंतवणुक करणाऱ्या दक्षिणेतील राज्यांना प्रत्येकी १० ते १२ रेल्वे मिळाल्या,असे का?फक्त नाव कोकण रेल्वे,फायदा मात्र दक्षिणेतील राज्यांना,कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी येथील भूमिपुत्रांना आपल्या जमिनी दिल्या त्यांना काय मिळाले तर शेळयां मेंढया सारखा प्रवास करण्याचा अनुभव.
आणि या साठीच मुंबईत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेवर काम करणाऱ्या २२ प्रवासी संघटना एकवटल्या आहेत.त्यात १) कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि. ठाणे, २) वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना – वसई विरार, ३) कोकण रेल्वे प्रवासी संघटना – मुंबई, ४) अखिल कोकण विकास महासंघ, ५) कल्याण सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना – कल्याण डोंबिवली, ६) गणेशभक्त कोकणवाशीय प्रवासी संघटना – लालबाग परळ, ७) कोकण रेल्वे जागरूक प्रवासी संघ – बोरीवली, ८) रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ – नवी मुंबई, ९) डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी रेल्वे प्रवासी संघटना रजि. – डहाणू , १०) निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण, ११) जल फाउंडेशन – खेड, १२) सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना, १३) सावंतवाडी टर्मिनस कृती समिती, १४) विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई / ग्रामीण,१५) कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती – चिपळूण, १६) आम्ही वसई विरारकर,१७) कोकण कृती समिती – मुंबई,१८) मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, १९) आम्ही पालघरकर, २०) आवाहन फॉर परिवर्तन संस्था – नवीन पनवेल, २१) आमची पश्चिम रेल्वे – मुंबई, २२) बोरीवली सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना – बोरीवली ह्या सर्व संस्था मागील अनेक वर्षांपासून वैयक्तीक पातळीवर कोकण रेल्वेच्या अनेक समस्यांचा पाठपुरावा करत होत्या मात्र त्यात त्यांना अपेक्षित यश मिळत नसल्याने एकच ध्यास कोकणाचा विकास असे ब्रीदवाक्य घेऊन मुंबईत एल्गार सभेचे आयोजन केले आहे.
रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा.सोशल सरविस लिग हायस्कूल,दामोदर हॉलच्या बाजूला परळ मुंबई येथे सावंतवाडी स्टेशनला सुसज्य टर्मिनस बनवावे व त्याला मधू दंडवते यांचे नाव दयावे, कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून त्याचे दुहेरीकरण करण्यात यावे,पश्चिम रेल्वेच्या वसई ते सावंतवाडी पॅसेंजर तर मध्य रेल्वेच्या कल्याण ते सावंतवाडी पॅसेंजर सुरू करून नेहमीसाठी दादर चिपळूण मेमू ,मुंबई रत्नागिरी इंटरशिटी एक्सप्रेस सुरू करावी,तर कोकण रेल्वेवरील बहुतांश रेल्वेना रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी थांबे मिळावेत अशा अनेक मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तर सभेत चर्चेसाठी जास्त वेळ मिळावा म्हणून सर्वानी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन घेऊन यावे व जास्तीत जास्त चाकरमन्यांना या सभेची माहीती दयावी असे आवाहन सभेचे आयोजक श्री.यशवंत जडयार मो.८६९८१९४८५१ सेक्रेटरी : वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना – मुंबई व श्री.राजू कांबळे – मो.८६९३८६१२३८ प्रमूख : कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि.ठाणेच्या वतीने करण्यात आले आहे.
कोकण रेल्वेच्या प्रश्नांवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची परळ मुंबई येथे एल्गार सभा….
