अगदी लहानापासून कलेची आवड असणारे गेली कित्येक वर्षे या रंगदेवतेची सेवा करणारे, ज्यांनी आता पर्यंत नमन/जाखडी/शाहीरी या कलेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केले आणि अजूनही या कलेत कार्यरत आहेत, त्याच बरोबर कलेच्या माध्यमातून आपल्या माचाळ गावच नाव रोषण करणारे आदरणीय नामवंत शाहीर गोविंद धोंडू मांडवकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन
‘नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत – महाराष्ट्र राज्य’ यांनी गावोगावी जाऊन अशा वरिष्ठ कलाकारांच्या कलेची दखल घेत पुरस्कारासाठी निवड केली त्या मध्ये मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळखल जाणारे लांजा तालुक्यातील एकमेव ठिकाण म्हणजे “माचाळ गाव” या गावातील कलाकाराचा समावेश आहे, आपल्या गावच्या कलाकाराला राज्यस्तरीय पुरस्कारा साठी निवड झाली आहे या गोष्टीचा माचाळ गावच्या ग्रामस्थांना आनंद आहे, कलेच्या माध्यमातून माचाळ गावाच नाव मोठ करणारे शाहीर श्री.गोविंद मांडवकर यांच कलाक्षेत्रात खूप मोठ योगदान आहे, हा पुरस्कार रविवार दिनांक १७/१२/२०२३ रोजी साहीत्यसंघ गिरगाव ह्या ठिकाणी पार पडणार आहे
माचाळ गावाच्या शिरपेच्यात अभिमानाचा तुरा….”माचाळ गावच रत्न” शाहीर गोविंद मांडवकर यांना ‘लोककला गौरव पुरस्कार’ जाहीर..
