आ.डॉ.देवरावजी होळी यांचीऔचित्याच्या मुद्द्यावरील चर्चेतून विधानसभेत मागणी
विजय शेडमाके.
दिनांक १३ डिसेंबर नागपूर
२०१४-१५ पासून विदर्भाची काशी असलेल्या मार्कंडा देवस्थानच्या दुरुस्तीचे काम करण्याकरिता पुरातत्त्व विभागाकडे जबाबदारी दिली आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षतेमुळे मंदिराचे काम अजूनही प्रलंबित आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकर व्हावे यासाठी मागील ८-९ वर्षापासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. मात्र त्या निधीचाही अजून पर्यंत उपयोग करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय होण्याची आवश्यकता असून त्याकरिता सरकारच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन होणे आवश्यक आहे. तरी या संदर्भात या अधिवेशन काळामध्ये बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी औचित्याच्या मुद्द्या वरील चर्चेतून विधानसभेत केली.