लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदभाऊ पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

वृद्धाश्रम येथे साडी-चोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच सायकलरिक्षा चालकांना ब्लॅंकेटचे वाटप
विजय शेडमाके.
गडचिरोली :-दि.१२ डिसेंबर भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकसभा समन्वयक,आदिवासी सेवक (म.रा.शासन पुरस्कृत) तसेच माजी नगरसेवक मा.इंजि.प्रमोदभाऊ पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरामध्ये दि.१३ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी १.०० वाजता वृधश्रमातील आश्रित महिला वृद्धांना साडी-चोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,दुपारी २.३० वाजता सायकलरिक्षा चालकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच दुपारी ३.०० वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

Exit mobile version