सामाजिक सेवाभावी संघटना, मुंबईच्या दिनदर्शिका २०२४ चा लोकार्पण सोहळा संपन्न.

मुंबई – (प्रमोद तरळ) बुधवार दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ८.३० वा.सामाजिक सेवाभावी संघटना मुंबईच्या वतीने दुसऱ्या वर्षाच्या दिनदर्शिका २०२४ चा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला
यावेळी प्रमुख मान्यवर समाजसेवक/उद्योजक श्री.रघुनाथजी कळभाटे समाजसेवक/उद्योजक श्री.अनंतजी फिलसे समाजसेविका सीमा शिंदे मॅडम आणि व्यावसायिक श्री.श्याम चिखले उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत मान्यवर आणि व्यवसायिकांचे स्वागत करण्यात आले,तसेच प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सचिव श्री.संदिप वासुदेव मांडवकर यांनी संघटनेच्या कार्याचा माहिती दिली.
यावेळी संस्थापक,अध्यक्ष श्री.संभाजी सोनू मालप यांनी व्यावसायिक आणि समाज कार्यावर भविष्यात मोठ्या प्रमाणात काम करणार असल्याचे सांगितले.
‌या कार्यक्रमांसाठी खजिनदार कु.स्वप्निल नागले, श्री. राजेंद्र म्हाद्ये, श्री.दिलीप पावनाक सर,श्री.संजय टरफले, श्री.राजू सावंत, श्री.मंगेश घडवले,श्री. विजय खानविलकर, श्री.अजित वतरी, सौ.सोनल वतरी इतर व्यावसायिक आणि संघटनेचे सदस्य उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या अंतिम संघटनेचे सचिव श्री.संदिप वासुदेव मांडवकर सर्व जाहिरातदार आणि उपस्थितीत समाज बांधवाचे आभार मानले.

Exit mobile version