शक्ती भक्ती पायी दिंडी प्रस्थान सोहळ्यास निलेश भोईर यांची उपस्थिती..

शहापूर – (प्रमोद तरळ) शिवगर्भसंस्कारभूमी ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी, लेण्याद्री ओझर शक्ती भक्ती पायी दिंडी सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात आले असून आज शिवतीर्थ शहापूर येथुन या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले या प्रस्थान सोहळ्यास काँग्रेसचे युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक निलेश भोईर यांनी उपस्थित राहून शरद फर्डे यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेल्या व शिवविचारांचे जागर करणाऱ्या या दिंडी सोहळ्यास भरभरून शुभेच्छा दिल्या.व या दिंडी सोहळ्याचे गावच्या वेशीवर ग्रामस्थांनी उस्फूर्त स्वागत करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा,शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश भांगरथ, काशिनाथ तिवरे, कैलाश महाराज निचिते आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version