पोलिस रायझिंग डे सप्ताह निमित्त महापालिका शाळेत व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम…

मुंबई – (प्रमोद तरळ) दि. ४ जानेवारी २०२४ रोजी बृहन्मुंबई पोलिस दल अंतर्गत डोंगरी पोलीस ठाणे व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने पोलिस रायझिंग डे सप्ताह निमित्ताने डोंगरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये डोंगरी पब्लिक स्कूल , या ठिकाणी व्यसनमुक्ती अभियान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे मुंबई शहर जिल्हा संघटक, विवेक साळवी यांनी उपस्थित विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग यांना व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक मानसिक, कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणामांना कशाप्रकारे तोंड द्यावे लागते, तसेच त्यांचे सेवन व त्याचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली, तसेच व्यसनापासून दूर राहण्यासाठी काय केले पाहिजे, इतरांना कसे दूर ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाअंती उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमास डोंगरी पोलीस ठाण्याचे , सहायक पोलीस निरीक्षक रत्ना खंडेलवाल, विधायक भारतीचे सहकारी,प्रथम फाउंडेशनचे सहकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक गण, दहशतवादी विरोधी पथक कर्मचारी व मिल्स स्पेशल उपस्थित होते.

Exit mobile version