रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ आणि ७ मध्ये भाजप शहर महिला मोर्चाच्या वतीने हळदीकुंकु समारंभ संपन्न..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी शहरामध्ये हळदीकुंकू समारंभ करण्यात आला, शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साधारण पाच हजार महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहराध्यक्ष पल्लवीताई पाटील यांनी या संपूर्ण शहरात हळदीकुंकू समारंभाचे नियोजन केले होते.
            प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये विश्वनगर रत्नागिरी नगर परिषद वसाहत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभाला प्रभागातील साधारणपणे दोनशे पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती. आनंदाने आणि गुणा गोविंदाने हा समारंभ पार पडला
भारतीय जनता पार्टी कडून घेण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभाचे प्रभागातील आयोजन भारतीय जनता पार्टीच्या ओ.बी.सी. महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता प्रवीण रूमडे, युवा मोर्चाच्या निधी निलेश आखाडे यांनी केले होते.


               रत्नागिरी शहरातील हळदीकुंकू समारंभासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने व त्यांच्या पत्नी माधवीताई माने यांच्या सहकार्यातून रत्नागिरी शहरात तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाताताई साळवी यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात हळदी कुंकू समारंभ सर्वत्र संपन्न झाले.    दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version