ठाणे- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १५ गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत,नागेश्वर सेवा संघ चोरवणे पुरस्कृत साईनाथ क्रिकेट संघ चोरवणे गडकरवाडी गावठण आयोजित साईनाथ चषक २०२४ स्पर्धेत १७ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी खारलँड मैदान कळवा पश्चिम येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उदघाटन श्री.दत्ता मोरे,श्री.संदीप उतेकर,श्री.संदीप जाधव,श्री.दिलीप उतेकर, श्री.संजय धनावडे, श्री.संजय उतेकर, श्री.प्रकाश शिंदे,श्री.वसंत मोरे,श्री.हरिश्चंद्र शिंदे, श्री.श्रीधर शिंदे,श्री.प्रदिप शिंदे,श्री.शिवाजी भोसले, श्री.सुनील शिंदे,श्री.संतोष उतेकर,श्री.प्रमोद शिंदे, श्री.राजेंद्र भोसले,श्री. प्रशांत उतेकर यांच्या शुभहस्ते झाले.या स्पर्धेत २६ संघांनी सहभाग घेतला होता.दोन दिवसीय स्पर्धा अतिशय रंगतदार झाली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईनाथ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष-सतिश शिंदे, उपाध्यक्ष- उमेश शिंदे सचिव-दिपक सकपाळ, सहसचिव-कु.विशाळ उतेकर खजिनदार- आकाश शिंदे, सह खजिनदार-कु.सिद्धेश उतेकर सल्लागार- श्री.सतिश शिंदे, श्री.सचिन शिंदे,श्री.दिनकर शिंदे,आणि सर्व सभासद यांनी खूप मेहनत घेतली.स्पर्धे दरम्यान अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब, वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री.अशोक उतेकर साहेब,तसेच पोलीस अधिकारी, त्याप्रमाणे साईनाथ क्रिकेट मंडळाचे संस्थापक श्री.सुभाष सकपाळ, ठाण्यातील नामवंत टेनिस क्रिकेट संघ श्री.इलेव्हनचे लिजेंड खेळाडू रंजितकुमार पिलै,श्री.राजू शिंदे साहेब,पूजा ताई शिंदे,तसेच १५ गाव फेडरेशन अध्यक्ष-दिलीप उतेकर,उपाध्यक्ष-महेश महापदी, सचिव-प्रशांत पालांडे,खजिनदार- योगेश उतेकर,मा.कार्याध्यक्ष- प्रताप उतेकर आणि सल्लागार, सभासद उपस्थित होते.तसेच पंधरागावांतील तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट दिली.त्याच प्रमाणे नागेश्वर सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी तसेच सभासदांनी सदिच्छा भेट दिली.
या स्पर्धेत अंतिम विजेता संघ-जय हनुमान साखर जांभूळवाडी, द्वितीय विजेता संघ – पंचशील वावे,तृतीय विजेता संघ – मानाई माता कुरवळ जावळी, चतुर्थ विजेता संघ-ए वन पोसरे,
शिस्तबद्ध संघ-आई महाकाली चोरवणे डांगेवाडी,तसेच उत्कृष्ट फलंदाज-रोहन चव्हाण, उत्कृष्ट गोलंदाज- अक्षय उतेकर, मालिकावीर- रोहन चव्हाण,उत्कृष्ट क्षेत्ररक्षण- स्वप्नील,दिनेश शिंदे (भाई ),सर्वाधिक षटकार-रोहन चव्हाण, सर्वाधिक चौकार-
साहिल सुतार,विकेट हॅट्रिक- अजित शिंदे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्व संघांचे तसेच उपस्थित सर्व खेळाडू,मान्यवरांचे, देणगीदार,१५ गाव क्रिकेट फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि सभासद,मैदान उपलब्ध करुन देणारे राजू शिंदे,you tube च्या माध्यमातून स्पर्धेचे थेट प्रेक्षपण करणारे अजित उतेकर,सर्व समालोचक आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व्यक्तीचे मंडळाचे वतीने आभार मानण्यात आले.
साईनाथ क्रिकेट संघ चोरवणे मुंबई आयोजित “साईनाथ चषक २०२४” स्पर्धेत जय हनुमान साखर जांभूळवाडी विजेता आणि वावे पंचशील ठरला उपविजेता
