समाजसेवी व्यक्तिमत्त्व संजय सिताराम भोसले यांचे निधन

संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावावर शोककळा….

रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.कासार कोळवण (मावळती वाडी )गावच्या श्री कांडकरी विकास मंडळ सदस्य,रहिवाशी संजय सिताराम भोसले (वय- ४५ वर्ष )यांचे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले.ही दुःखद घटना त्यांच्या परिवारावर खूपच दुःखद आहे.संजय भोसले हे नोकरी करून टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करत होते.कधी कोणाला कोकणात गावी जायला तिकीट संदर्भात शब्द दिली की ते खाली पडू देत नव्हते.त्यांची ऐनवेळी लोकांना खूप मदत मिळत होती.त्यामुळे ते पंचक्रोशीत चांगले परिचित होते.साधी राहणीमान,उच्य विचार असे एक चांगले व्यक्तिमहत्व, ट्रॅव्हल्स आणि प्रवाशी यामधील दुवा आपल्यामधून निघून गेला आहे.याचे दुःख गावासह पंचक्रोशीत व्यक्त केले जात आहे.संजय भोसले यांच्या अकाली मृत्यूची बातमी वाचून खूप दुःख झाले.ऐन उमेदीच्या काळात असे अचानक आयुष्य संपल्याने भोसले कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.त्यांना या दु:खातून सावरण्याची कुटुंबियांना शक्ती मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना यामित्ताने कासार कोळवण गावचे समाजसेवक मोहन कदम, श्री कांडकरी विकास मंडळ पदाधिकारी, सदस्य यांनी केली असून त्यांनी मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.संजय भोसले यांच्या पश्चात आई -वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे.संजय भोसले यांच्यावर कासार कोळवण या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version