पेण – (प्रमोद तरळ) मुक्काम मसद खुर्द, पोस्ट शिर्की, तालुका पेण ,जिल्हा रायगड येथील स्थायिक समाजसेवक , सेवा निवृत्त शिक्षक जोमा रामा पाटील यांना
रायगड जिल्हा परिषदेकडून रायगड भुषण पुरस्कार सन २०२० साली प्रदान करण्यात आला. त्यांचा यथोचित सत्कार आॅर्थोपेडिक ओटी व टीओटीतील स्टाफ यांच्यातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त जोमा रामा पाटील हे निवृत्त उत्कृष्ठ शिक्षक म्हणुन सर्वत्र परिचित आहेतच. त्याशिवाय अध्यात्मिक मार्गदर्शन करून समाज प्रबोधनही करतात. शिक्षकांना शाळेत जाऊन भेटीगाठी घेऊन अनुभवाचे ज्ञान देतात. अल्प बचत गुंतवणुकीत प्रशसनीय कार्य करतात. ग्राम पंचायत मसद बुद्रुक पंचक्रोशी विभागात शैक्षणिक व सामाजिक
क्षेत्रात सातत्याने मोलाचे कार्य करीत असतात. ऑपरेशन थियेटर मधील निवृत्त झालेले अनंत दाभोळकर, जनार्दन गावंड, इंद्रकांत रिळकर,अशोक साळवी, बळिराम गायकवाड, सुधाकर भोईर, रमाकांत म्हात्रे,पांडुरंग सुतार, याजबरोबर प्रदिप टुकरूल, संदिप तावडे, प्रकाश पेडणेकर, महेश कुडतरकर, कृष्णा मोरे, जितेंद्र सींग, राज लोखंडे, राहुल शर्मा, प्रशांत तांबडे, संजय पाटील, आदीनी शुभेच्छा दिल्या. पत्रकार अनंत दाभोळकर यांनी जोमा रामा पाटील यांचे कार्य पाहता पाटील हे या मसद गावाचे चालते बोलते व्यक्तिमत्व असुन एक समाजाचेही भुषणसुद्धा आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद् गार काढले. यावेळी अशोक साळवी यांनीही आपल्या भाषणात गौरव केला.
बाॅम्बे हाॅस्पिटल ओटी स्टाफकडुन जोमा रामा पाटील यांचा सत्कार.
