शौचालय निधी घोटाळेबाजांवर फौजदारी कार्यवाहीसाठी अर्धनग्न उपोषण.

गटविकास अधिकारी जे.पी.जाधव यांच्या अहवालात गैरव्यवहार आणि अनियमितता नमूद असताना सुद्धा फौजदारी नाही

रत्नागिरी :- रत्नागिरी तालुक्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायत मधील शौचालय घोटाळा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र-रत्नागिरी चे प्रचार प्रमुख निलेश राहाटे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर उघडकिस आणला होता,त्यामध्ये ग्रामसेवक यांना पाच ( ५ लक्ष) लाख इतकी रक्कम भरणा करण्यासाठी आदेश पंचायत समिती मधून दिले होते.आणि सरपंच यांना करणे दाखवा नोटीस बजावली होती.
सदर, विषयी गट विकास अधिकारी जे.पी.जाधव यांनी दिलेल्या अहवालात मध्ये ग्रामपंचायत च्या कारभारात गैरव्यवहार आणि अनियमितता दिसून येत आहे,म्हणूनच घोटाळा झाल्याचे, कागदपत्रे खाडाखोड झालेच, अहवालात बदल केल्याचं प्रकार झालेने त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या साठी २६ फेब्रुवारी २४ ला जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्ध-नग्न उपोषण केले .त्यावेळी उपोषण स्थगित करावं अशी विनंति करण्यात आली असून,येत्या २८ फेब्रुवारी २४ रोजी १२.३० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक लावून यावर कार्यवाही केली जाईल,अश्या आशयाचे पत्र निलेश रहाटे ना देण्यात आले आहे.अशी प्रतिक्रिया देतांना ते माध्यमांशी बोलत होते.

             माहिती अधिकार महासंघाचे काम आणि कार्य या रत्नागिरी जिल्ह्याला ठाऊक झाले आहे,गैरव्यवहार करणाऱ्या कोणताही विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अस सहजासहजी सोडणार नाही,तशीच शिकवण आम्हा कार्यकर्त्यांना आमचे अध्यक्ष सन्मा.सुभाष बसवेंकर आणि राज्य सचिव सन्मा.समिर शिरवडकर यांची आहे

माहीती अधिकार महासंघ महाराष्ट्र -मुख्य प्रचार प्रमुख रत्नागिरी – निलेश रहाटे

Exit mobile version