आरगाव (गांगेश्वरवाडी) येथील महाशिवरात्री उत्सवा निमित्त राज्यस्तरीय भव्य समूह नृत्य स्पर्धा…

लांजा – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे आरगाव येथील स्वयंभू श्री गांगेश्वर‌वाडी सेवा मंडळाच्या वतीने गुरुवार दि. ७ ते शनिवार दि. ९ मार्च २०२४ या कालावधीत महाशिवरात्री उत्सवा निमित्त भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
‌. ‌‌. गुरुवार दि.७ रोजी सायं ५ ते १० वा. पर्यंत जिल्हास्तरीय अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दि.८ रोजी स.९ ते ११ या वेळेत श्री गांगेश्वर अभिषेक, सायं ४ ते ६ दिंडी मिरवणूक सायं ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ, रा. ९ ते ११ या वेळेत ह.भ.प.नामदेव पाटील महाराज कोल्हापूर यांचे किर्तन शनिवार दि
९ रोजी स. १० ते दु १२.३० हे.भ.प. कॄष्णकांत‌ काजवे महाराज संगमेश्वर यांचे काल्याचे किर्तन, दु. १२.३० ते ३ महाप्रसाद, सायं ६ वा. श्री सत्यनारायण महापूजा,आरती व तीर्थप्रसाद रात्री ९ वा. राज्यस्तरीय भव्य समूह नृत्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर महाशिवरात्री उत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमांना भक्त गणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्वयंभू श्री गांगेश्वर‌ सेवा मंडळ आरगाव यांनी केले आहे

Exit mobile version