जोगेश्वरी – पूर्व येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलावातील गाळ काढण्याच्या कामात परेश इनफ्रास्ट्रक्चर या खासगी कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्यामुळे हजारो जलचर प्राणी मृत्यूमुखी पडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.गाळ उपासण्याचे काम करण्यापूर्वी या कंत्राटदाराने तलावातील मासे, कासव, जलचर प्राणी यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे अपेक्षित होते.परंतु कंत्राटदाराने तसे न करताच गाळ उपासण्याचे काम सुरू केले.त्यामुळे हजारो जलचर प्राण्यांचा हकनाक बळी गेला असून तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे.या कंत्राटदारावर महापालिका प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोगेश्वरीतील जागरूक नागरिक करत आहेत.दरम्यान ही घटना जोगेश्वरीतील पर्यावरणप्रेमींनी सर्वांसमोर आणली आहे.’जोगेश्वरी ६० मित्र परिवार’ या सोशल मीडिया ग्रुपद्वारे सर्वप्रथम ही घटना उजेडात आली.त्यांनी याबाबत मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत रीतसर पत्र देऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
- Home
- जोगेश्वरीत कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हजारो माशांचा मृत्यू, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी …
जोगेश्वरीत कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हजारो माशांचा मृत्यू, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी …
-
by Nilesh Akhade - 102
- 0

Leave a Comment
Related Content
-
-
रत्नागिरीतील ड्रीम मॉडेल क्राफ्ट फर्मच्या तरुणांनी तयार केली भारतीय नौसेनेची कोलकत्ता बोट
By Nilesh Akhade 1 week ago -
मी तुला नेहेमी सुखी ठेवेन...' चिमुकल्यांनी दिलं वचन....
By Nilesh Akhade 1 week ago -
निवेदने,आंदोलने,राहिली कागदावरच आदानींचा स्मार्ट मीटर खेडेगावात जोरात सुरू.
By Nilesh Akhade 1 week ago -
भाजप महिला मोर्चा रत्नागिरी द. तर्फे आंबेड बु. येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
By Nilesh Akhade 1 week ago -
देवराईंच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी १० मार्चला रत्नागिरी येथे घंटानाद आंदोलन.
By Nilesh Akhade 1 week ago