संगमेश्वर भाजपाचा शिवसेना ठाकरे गटाला दे धक्काजिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घोडवली गावातील शेकडो ग्रामस्थांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश


जिल्हा चिटणीस मनीष सावंत यांच्या अथक प्रयत्नाने तसेच निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव,तालुका अध्यक्ष रुपेश कदम आणि ओबीसी जिल्हा अध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्या संयुक्त सहकार्याने


संगमेश्वर (देवरुख)- देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत,१० वर्ष मोदी सरकारची आता संपत आली पण मोदी लाटेला पुन्हा नव्याने भरती येवू लागलीय.
आज संगमेश्वर तालुक्यात राजकीय भूकंप झाला तालुक्यातील घोडवली गावातील शिवसेना ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी संगमेश्वर भाजपा कार्यालय देवरुख येथे भाजपाचे कमळ हाती घेतले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आणण्याचा निर्धार करून “फिर एक बार मोदी सरकार ” चा नारा देत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घोडवली गावातील शेकडो ग्रामस्थांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश केला .भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव बने यांच्या नेतृत्वाखाली या पक्षप्रवेशासाठी जिल्हा चिटणीस मनीष सावंत यांच्या अथक प्रयत्नाने तर निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव,तालुका अध्यक्ष रुपेश कदम आणि ओबीसी जिल्हा अध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी सहकार्य केले. या पक्षप्रवेशामुळे संगमेश्वर शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी संगमेश्वर कार्यालय देवरुख येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,महिला मोर्चा,ओबीसी मोर्चा,सोशल मीडिया,युवा मोर्चा आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
प्रवेश कर्ते – सरपंच वैदेही बने ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मीना बने,रवींद्र भेरे,नैना जाधव-बने, माजी ग्रामपंचायत सदस्य अपर्णा बडद, परशुराम घडशी (गावकर ),वैभव बने, भालचंद्र बने,अरविंद बडद ,राजाराम बने,अनंत घडशी,प्रताप बने,प्रकाश कदम,बाळाराम भेरे,दिलीप गुरव,श्रीपत भेरे,अपर्णा बडद,रुपाली कदम,पल्लवी बने,सुभाष भेरे,राजाराम गुरव,उमेश दळवी,कल्याणी घडशी,मयुरी भेरे,सत्यवती घडशी,शालिनी भेरे,आर्या आग्रे,प्रमोद मेस्त्री,संतोष मेस्त्री,प्राजक्ता घडशी ,सीताराम शिंदे

Exit mobile version