महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्री परशुराम मासये…

रत्नागिरी – (प्रमोद तरळ) महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ या शासन मान्यता प्राप्त महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी श्री परशुराम मासये ( तालुका राजापूर) यांची निवड करण्यात आली. राज्य अध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी केंद्रीय सल्लागार श्री रवींद्र वेंदे , राज्य महासचिव श्री प्रवीण खाडे , कोकण विभागीय अध्यक्ष श्री मिलिंद धंबा उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर विभागातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे श्री परशुराम मासये यांनी सांगितले. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून श्री परशुराम मासये यांचे अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version