‘आपला माणूस गणेशभाऊ खेडेकर’ यांना‌ संत रविदास समाज भूषण पुरस्कार प्रदान…,

मुंबई:- (प्रमोद तरळ) बृहन्मुंबई महानगर पालिका आणि संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती यांचा संत रविदास समाज भूषण पुरस्कार चर्मकार समाजाचे व सामाजिक चळवळीतील झुंजार आणि आक्रमक लोकनेते आपला माणुस गणेशभाऊ खेडेकर जनसेवक यांना समन्वय समिती यांच्या तर्फे दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदर कार्यक्रमास नगरसेविका आशाताई मराठे,चर्मकार नेते सुभाष मराठे,संजय खामकर,राजेश खंदारे, शिवलिंग व्हटकर,रमेश कदम, नवनाथ शिंदे,शंकर संटी, आणि चर्मकार समाजातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, सदस्य तमाम नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आला. तळागाळातील लोकांच्या सर्वोतोपरी समस्यांचे निराकरण करण्यात अग्रेसर असणारे,समाजातील लोकांची समस्या निस्वार्थीपणे सेवा देणारे, गणेशभाऊ खेडेकर यांचा संत रविदास समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने समाजात आनंद आणि समधान व्यक्त करण्यात येत असून बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आणि संत शिरोमणी रोहिदास समन्वय समितीचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.बृहन्मुंबई महानगर पालिकेने योग्य व्यक्तींचा सन्मान केल्याबद्दल नागरीकांमध्ये समधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version