कशेळीच्या अर्पिता सावरेची अभ्यास दौऱ्यासाठी निवड…

राजापूर :- (प्रमोद तरळ) तालुक्यातील
आडिवरे परिसरातील कशेळी गावातील जि.प.सुयोग विकास विद्यामंदिर कशेळी नंबर ५ शाळेची विद्यार्थिनी कुमारी अर्पिता प्रकाश सावरे इयत्ता ६ वी. हिची जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
सन २०२३-२४ मध्ये रत्नागिरी जि. प. मार्फत दर महिन्याला निपुण चाचणी घेण्यात आली त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कुमारी अर्पिता सावरे राजापूर तालुक्यामध्ये अव्वल ठरल्यामुळे तिची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
सदर अभ्यास दौरा हा बेंगलोर कर्नाटक येथे जाणार आहे. यासाठी तिला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मुग्धा दाते, शिक्षक सुनिल जायदे, मिलिंद नार्वेकर, मानसी घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. अर्पिताच्या या यशाबद्दल तिचे व शाळा कशेळी नंबर ५ चे कशेळीतील व परिसरातील सर्व ग्रामस्थांकडून,विविध स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version