कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई) शाखा – तालुका राजापूर (मुंबई) संलग्न, कुणबी युवा राजापूर मुंबई आयोजित, माळी गुरुजी चषक २०२४ चे आयोजन.

वसई :- (प्रमोद तरळ)
कुणबी समाजातील सर्व क्रिकेट खेळाडूंचे तसेच क्रिकेट रसिकांचे आवडते भव्य दिव्य असे राजापूर तालुक्यातील मानाचे चषक, माळी गुरुजी चषक २०२४ हे चषकाचे
वर्ष ५ वे‌ वर्ष असून यंदा ही स्पर्धा रविवार दि १७ मार्च २०२४.रोजी सकाळी ठीक ०८.०० वाजता, उमेलमाल मैदान नायगाव( पश्चिम) येथे आयोजित केली गेली आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या संघाची २ फेब्रुवारी २०२४. पर्यंत एंट्री फी भरून संघ निश्चित करावा.तसेच ०५ मार्च २०२४. या तारखेपर्यंत संपूर्ण एंट्री फी भरून बुधवार, दि. ०६ मार्च २०२४. रोजी. संध्याकाळी ठीक ६.३० वा. संघ कार्यालय वाघे हॉल परेल येथे लॉट्स पाडण्यात येतील.एंट्री फी भरल्या शिवाय कोणत्याही संघाला कन्फर्म केले जाणार नाही.
स्पर्धेसाठी निश्चित झालेल्या संघाच्या कर्णधारांनी त्या दिवशी उपस्थितीत राहून आपल्या सूचना मांडाव्यात स्पर्धेतील सहभागासाठी महेश गोंडाळ – ८०९७०७४२३२, सचिन कुंभार – ८६५२२४४८०३, मनिष वालम – ९७६९३९९२९६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन कुणबी युवा राजापूर (मुंबई) यांनी केले आहे

Exit mobile version