पीक कर्जा वरिल वसुल केलेले व्याज शेतकऱ्यांना परत करावे.

विजय शेडमाके
दीं,१८/०३/२०२४
गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त पीक कर्जाचे वितरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माध्यमातून सेवा सहकरी आणि आविका सहकारी संस्थे मार्फत केले जाते. या वर्षी बँकेने व्याजासह मुद्दल रक्कम वसुल करण्याचे धोरण स्वीकारले असताना राज्याचे सहकार आयुक्त तथा निबंधक यांनी १४ मार्च २०२४ ला पिक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली न करण्याचे आदेश काढले असताना सुद्धा जिल्हा सहकारी बँके कडून व्याजाची वसुली करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था यांनी पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यां कडून व्याजाची वसुली न करण्याचे निर्देश जिल्हा सहकारी बँकेला द्यावेत. आणि ज्या शेतकऱ्यां कडून व्याजाची वसुली केली आहे. त्यांची व्याजाची रक्कम ताबडतोब परत करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी जय विदर्भ पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील मुनघाटे , अशोक पोरेड्डीवार , नसीर जुम्मन शेख , राजेंद्रसिंह ठाकूर, घीसु पाटील खुणे, शालीक पाटील नाकाडे, ग्यानचंद सहारे, रमेश उप्पलवार , वेणुदास वाघरे, यांनी एका पत्रकातून केली आहे.

Exit mobile version