चिपळूण – (प्रमोद तरळ) जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेचा मार्च २०२४ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून कुमारी तन्वी विजय आग्रे ८४.६०%, प्रथम क्रमांक तसेच कुमार.दक्ष रोहिदास कदम ८४.४०% द्वितीय क्रमांक आणि कुमार.दर्शन दत्ताराम राणीम ८३.४० व कुमार दर्शन दीपक तांबे ८३.४०% यांनी विभागून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेतून यावर्षी एकूण ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत , २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी टेरवचे अध्यक्ष श्री. विकास कदम, सचिव श्री. योगेश कदम, खजिनदार श्री. अजित कदम तसेच सर्व संचालक मंडळ, ग्रामस्थ व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुमन विद्यालय टेरव प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल १००%
