वैतरणा:- (प्रमोद तरळ) पच्छिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानक परीसराला जोडलेल्या ६ ते ७ गावातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती .गाव पाड्यातून वैतरणा स्थानकात आणि शहराकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती केली जावी अशी मागणी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने वसई विरार महानगरपालिका तसेच त्या रस्त्याचा वापर करत असलेल्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती .
सर्वसामान्य प्रवाशांना होणारी अडचण लक्षात घेऊन प्रसार माध्यम पत्रकार मित्रांनी देखील या गंभीर विषयाची दखल घेतली होती. पालिका प्रशासन ,संबंधित विभागाने तक्रारींची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने. ह्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना तुर्ताच सोईस्कर असा प्रवास करता येणार आहे.
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन रस्त्याची दुरुस्ती केल्याबद्द्ल डहाणू वैतरणा सेवाभावी संस्था आणि प्रवाशांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले परंतु या रस्त्यावर होत असलेला अवजड वाहनांचा लोड पाहता येत्या आणि काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती ही पुन्हा पूर्वस्थिती होऊ शकते,त्यामुळे पालिकेने या रस्त्याकडे लक्ष ठेऊन वेळोवेळी दुरुस्ती करत राहणे आवश्यक आहे .शिवाय उर्वरित राहिलेल्या ह्या रस्त्याचे क्रोंक्रिट RCC , नूतनीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. जेणेकरून वारंवार दुरुस्तीसाठी लागणारे पालिकेचा लाखो रूपये खर्च वाया जाणार नाही असे डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतिश धर्मा गावड यांनी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे
वैतरणा रेल्वे स्थानक परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अखेर दुरुस्ती; डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नांना यश…
