मान.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचा मन की बात -११२ व्या भागाच्या प्रक्षेपणाचे आयोजन करून पाहतांना मा.खा.अशोक नेते.

गडचिरोली:-देश गौरव, विश्व गौरव, लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आज दि.२८ जुलै २०२४ रोज रविवार ला *मन की बात* ११२ व्या भागाचे कार्यक्रम प्रभाग क्रमांक-५ बुथ क्रमांक -९८ शाहूनगर गडचिरोली येथे मा. खा.श्री. अशोकजी नेते यांच्या निवास स्थान जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकारी प्रमुखांसह व कार्यकर्ता सोबत मन की बात कार्यक्रम पाहण्यात आला.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी मन कि बात मध्ये बोलतांना चंद्रपुर जिल्हातील वन्यजीव ताळोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या संरक्षणाकरिता प्रयत्न,उद्या टायगर “डे” मानावा,लोकल उत्पादनांचा आत्मविश्वास वाढवुन हैडलुम उत्पादनात वाढ व बढा़वा देण्यात यावा.युवकांनी नशा मुक्त होण्यासाठी नशा मुक्त भारत अभियानासाठी सरकारने मानस MANAS 1933 ही हेल्प लाईनाचा केंद्र खोलुन याचा उपयोग युवकांनी करावा.पॅरिस देशात ऑलिंपिक विषयी चर्चा,ऑलम्पिक मध्ये युवकांचा उत्साह वाढविण्यासाठी शुभकामना दिल्या.एक पेड़ माँ के नाम अंतर्गत झाडे लावावे. ह्या मन की बात मधील गोष्टी पटलावर आणल्या.

यावेळी सोबत प्रेक्षपण पाहतांना माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते. यांच्या सह जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे, भाजपा अनु.जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे,सिराजभाई पठान,महादेव पिंपळशेंडे,गणेश नेते,मनिषाताई उईके,लक्ष्मी कन्हाके, तसेच मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version