मा. ना. आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपत्ती काळात धावून जाणारी अग्रगण्य सामाजिक संस्था मदत ग्रुप खेड यांचा सत्कार..

खेड : महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खेड मधील आपत्ती काळात धावून जाणारी आपली अग्रगण्य सामाजिक संस्था मदत ग्रुप खेड चा विशेष सन्मान आणि सत्कार नामदार आदिती ताई तटकरे, मा.बाबाजी शेठ जाधव यांच्या हस्ते शनिवार दिनांक २७/०७/२०२४ रोजी तटकरे सभागृह खेड येथे मदत ग्रुप खेड चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद दिलीप गांधी यांचा सत्कार करण्यात आला.
खेड येथील मदत ग्रुप याचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद गांधी आणि त्यांचे मदत ग्रुपचे सहकारी यांच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो अपघातग्रस्त, आपत्तीग्रस्त, होतकरू अशा अनेकांना मदत करण्यात आली आहे. मदत ग्रुप खेडचे काम अनेकदा कौतुकास्पद ठरले आहे. आजयाची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ना. आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत ग्रुप खेडचा सन्मान करण्यात आला. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version