लोकमान्य शिक्षण संस्था सापुचेतळे संचलित कै. रा. सि. बेर्डे विद्यालयाच्या अध्यक्षपदी देवेंद्र शांताराम लोटणकर यांची बिनविरोध निवड.

लोटणकर यांनी यापूर्वी देखील ग्रामपंचायत वाघ्रट-वाडिलिंबूच्या सरपंच पदी यशस्वी कामकाज केले होते.

लांजा : तालुक्यातील नामांकित लोकमान्य शिक्षण संस्था सापुचेतळे संचलित कै.रा.सि. बेर्डे विद्यालयाच्या अध्यक्षपदी एकमताने देवेंद्र शांताराम लोटणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड संचालक मंडळातून करण्यात आली होती. सोमवार दिनांक 09/09/2024 रोजी सभासदातून 9 जणांचे संचालक मंडळ निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, परंतु मंगळवार दिनांक 10/09/2024 रोजी अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने एकमताने बिनविरोध निवड करून अखेर प्रतीक्षा संपली. लोटणकर हे अतिशय शिस्तप्रिय आणि अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी देखील त्यांनी सरपंच पद चांगल्या पद्धतीने हाताळले होते.शिक्षणाची गुणवत्ता आणि शाळेचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी संचालक मंडळाच्या साह्याने विशेष प्रयत्न करणार असल्याचे लोटणकर म्हणाले.

संचालक मंडळ खालीलप्रमाणे –
1) अध्यक्ष- देवेंद्र शांताराम लोटणकर
2) उपाध्यक्ष -सुधीर मुरलीधर लोटणकर
3) सेक्रेटरी -पद्माकर नारायण कोकरे
4) खजिनदार-पांडुरंग बाळकृष्ण कोकरे
5)भारती सुधाकर चांदोरकर.
6)प्रकाश भिकाजी चौगुले.
7)परशुराम शंकर पत्याणे.
8)विश्वनाथ गणपत गुरव
9)शंकर गोविंद गोरे.

Exit mobile version