पितृमहिमा…

असे मानले जाते की हजर श्राद्ध केले नाही तर आत्माला पूर्ण मोक्षप्राप्ती होत नाही. या स्थितीत आत्मा भरकटत राहतो. पितृपक्षात पितरांची पूजा आणि स्मरण केल्याने पितर प्रसन्न होतात. आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. वर्षभरामध्ये साधारण 24 पक्ष येतात. प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध आणि कृष्ण. परंतु या सर्वांमध्ये बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना मोहित असणारा पक्ष म्हणजेह पितृपक्ष ( भाद्रपद कृष्ण पक्ष ) या जगात ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूदेखील आहे. प्रत्येक जिवंत माणसाच्या ठिकाणी त्याच शरीर व त्याचा आत्मा असतो. आत्मा म्हणजे चैतन्य सनातन धर्मात आत्मा ही सर्वात महत्त्वाची संकल्पना मानली जाते. माणूस मरण पावला की त्याच शरीर पार्थिव नष्ट होत. परंतू आत्मा नष्ट होत नाही. तो अनादि , अनंत, निर्गुण – निराकार आहे. हाच आत्मा निसर्गातील चैतन्यशक्तीत विलीन झाला की माणसाच्या आत्म्याला सद्गती मिळते , असे आपल्याकडे समजले जाते.
मुळात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्मत:च त्याच्या डोक्यावर तीन प्रकारची कर्ज असतात. 1 देव ऋण 2 ऋषी ऋण 3 पितृ ऋण या तीन ऋणातून प्रत्येकाला आपल्या जीवनभरामध्ये मुक्त व्हायच असतं. जस एखाद्या बँकेकडून घेतलेले ऋण फेडल नाही तर बँक ज्या पद्धतीत कारवाई करते त्याच पद्धतीत हा प्रकार असतो. पण् देवाच्या बाबतीमध्ये अस काही घडत नाही. म्हणून ते आपल्याला लक्षात येत नाही. मनुष्याच्या आयुष्यात त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही. बुद्धीमत्ता असुन संधी मिळत नाही. उत्तम शिक्षण असूनही त्या पद्धतीत नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तरी ती जास्त काळ टिकत नाही, विवाह न होणे, तो न टिकणे, किंवा सततीदोष असे नानाविध प्रश्न जेव्हा आपल्या आयुष्यात निर्माण होतात. तेव्हा लक्षात घ्यायला हवं. की आपण ऋणातून मुक्त झालो नाहीत. तर या ऋणातुन मुक्त कसं व्हायच..
1) आपल्याकडून घडणार देव यज्ञ असेल किंवा काहीह यज्ञयादिक कार्य असेल. समजा आपण नैमतिक यज्ञयाग करत असू तर ते आपल्याला देव ऋणातून मुक्त करतात.
2) ऋषी ऋण : जेव्हा आपण नित्यसंध्या करतो. नित्य उपासना करतो. कुठल्याही देवतेहला नित्य स्मरतो, त्याची उपासना आपल्याला ऋषी ऋणातून मुक्त व्हायला मदत करते.ज्यांच्यामुळे आपल्याला हे जग पाहता आलं ते आपले पितर . मग ते आपले माता-पिता , आजी-आजोबा, पणजी-पणजोबा, ही जी आपली आधीच्या पिढीतली मंडळी आहेत. ती आपली पितर की ज्यांच्यामुळे आपण याा भूतलावर जन्म घेतला. ही भूमी , हे विश्व पाहता आलं. मग ऐवढे मोठे उपकार त्यांचे आपल्यावर आहेत. त्यांच्या उपकारांतून उतराई होण्याच्या काळ असतो तो पितृपक्ष कारण याच काळात ते वायुरूपाने ते पृथ्वीतलावर वास्तव्यास असतात. त्यामुळे आपण नेत्रांनी त्यांना पाहू शकत नाही. मात्र त्यांची मात्र आपल्यावर नजर असते हे नक्की. त्यामुळे यादरम्यान आपण कर्म चांगल ठेवण खूप गरजेचं आहे.तसं पाहता हा 15 दिवसांचा उत्सव त्यांच्यासाठीच असतो. त्यांना अन्नपाणी दिले , त्यांच्या इच्छांची पूर्तता केली म्हणजे आपल्याला पितृ ऋणातून मुक्त होता येत.
3) पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे त्यांना संतोष होईल अशी कर्म करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते.
दवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम्।
देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये. असा या उपनिषदाचा अर्थ होतो.
भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य न झाल्यास ज्या तिथिला आपले पूर्वज मृत झाले असतील त्या तिथिला या पक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वहायची असते, त्यांच्या नावे नैवेद्य द्यायचा . योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे, यावव्दवश्चिकदर्शन सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथिला महालय केला तरी चालतो.

सौ.पियल जोशी.. कुवारबाव रत्नागिरी.

Exit mobile version