औदुंबर : थोडा दुर्लक्षीत झालेला असा एक बहुगुणी वृक्ष; वास्तुशास्त्रापासून आरोग्यापर्यंत उपयुक्त असा हा वृक्ष.

उंबर किंवा औदुंबर (शास्त्रीय नाव: Ficus racemosa, फायकस रेसिमोझा ; कुळ: मोरेसी; ) हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले’ अशी आहे. यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात.

साक्षात दत्ताचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर वृक्ष. उंबराच्या झाडाला पार बांधला तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. म्हणून घराजवळ औदुंबर वृक्ष येणे म्हणजे पारंपरिक, पिढ्यानपिढ्या दत्त अधिष्ठान असणे. या औदुंबरामुळे आपल्या आयुष्यात काय फायदे होतात ते पाहूया. औदुंबर मुख्यत: लावत नाहीत. तो आपोआप रुजतो.
प्रत्येक जन्मात नियम असा की आज उपटून टाकल्यास याचे परिणाम भावी काळात अनुभवास येत राहतील.

तुळशी प्रमाणे हा वृक्ष २४ तास प्राणवायु सोडतो. म्हणुन उन्हातून आल्यावर याच्या सावलीत बसल्यास थंड वाटते व शिण जातो. औदुंबराच्या झाडामुळे त्या जमिनीत पाण्याचा मुबलक साठा असल्याचे संकेत मिळतात. त्याच्या वायव्येस (North West) दिशेला १० ते १५ फुटावर नक्की पाणी मिळते. या झाडाच्या सुकलेल्या काडय़ा होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही असे म्हणतात पण शास्त्रात फुलाशिवाय फळ नाही.

उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. औदुंबर झाडाची पाने कापून लहान तुकडे करून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात असे आयुर्वेदात सांगितले आहे. फळ हे तुरट असते पण कफ व पित्त यांचे शरिरातील योग्य प्र्रमाण ठेवण्यास उत्तम औषध आहे. भाजलेल्या त्वचेवर सालीचा रस उत्तम वेदनानाशकाचे काम करतो. मुळांचा रस शरिरातील दाह कमी करतो. उष्णतेच्या विकारावर अतिशय उत्तम. पांढऱ्या रंगाचा रस हा कापले तर त्यावर लावावा. रक्तस्त्राव थांबवतो. मुळांचा रस सेवन केल्याने मधुमेह सामान्य करण्यास मदत करतो. नाकातुन अचानक रक्त येणे या विकारावर पिकलेल्या फळाचा रस मध व गुळ घालून पियाल्यास विकार बरा होतो. वारंवार लघवी होणे या विकारावर कोवळ्या पानांचा रस १०० मिली व त्यात २० ग्रॅम साखर घालून १ चमचा मिश्रण दिवसातुन ३ वेळा घेतल्यास विकार पूर्ण बंद होतो. तोंडातील कोणत्याही विकारावर .. दात दुखणे, हिरड्यातुन रक्त येणे, जीभेला फोड येणे किंवा चट्टे पडणे याव ५० मिली सालाचा रस व ५० मिली पानाचा रस असे मिश्रण करुन २ चमचे तोंडात ५ मिनिटे ठेवणे असे दिवसात दोनदा केल्यास उत्तम औषधी होते.

हिवाळ्यात पाय फुटुन वेदना होतात त्या कमी करण्यासाठी व भेगा भरण्यास खोडातुन येणारा पांढरा रस थोडा सुखवून त्याचा लेप दिल्यास सर्व विकार नाहिसा होतो. फांदिवर येणाऱ्या कोवळ्या कोंबांचा रस हा कोणत्याही त्वचा विकारावर औषध आहे. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावतात. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गर्भपात या विकारावर पिकलेली फळे सेवन केल्यास उत्तम औषध होते.

काष्ठाचा रस काढून त्यात साखर / गुळ घालुन २ चमचे २ वेळा घेतल्यास अतिसार थांवतो. १ कप पाण्यात सुमारे २५ ते ३० ग्रॅम साल टाकून तो निम्मा होइपर्यंत काढा करावा. रक्तदोषांतक म्हणून खुप चांगला उपयोग होतो. सतत तहान लागणे या विकारावरही हा काढा उत्त्म औषध ठरते. आव पडणे यावर हाच काढा चालतो. याची फळे व सालीचा रस अंगाला चोळून आंघोळ केल्यास कुष्ठरोग बरा होतो. उंबराची फळे खाण्यासाठी वापरतात. याची पाने शेळी- बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. गोकर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.

विषावर उतारा म्हणूनही झाडाच्या चिकाचा उपयोग करतात. उंबराच्या झाडावर एक दैवी फूल असते जे मुख्यतः कोणालाही दिसत नाही. ज्याला ते फूल दिसते त्याच्या भक्तीला दत्त माऊलीनी प्रतिसाद दिला समजावे. वास्तुशास्त्रात याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून उंबराच्या लाकडाचा दाराच्या चौकटीत उंबरा (उंबरठा) बनविण्यासाठी वापर करण्याची पद्धत आहे. म्हणूनच त्याला उंबरा असे म्हटले जाते. यामुळे घरात शांतता येते. जीवन आनंदी होते. सुखे प्राप्त होतात. म्हणुन उंबरा / उंबरठा औदुंबराच्या लाकडाचा करावा. यामुळे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होतों. हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

आख्यायिका
विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला.

औदुंबर वृक्षाचा पाला, फळे, साली गाईला खायला घातल्याने गाय सुदृढ होते . या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ, पोथ्या वाचन केल्याने फळ मिळते ऱानात उंबर असेल तेथे भरपूर पक्षी व प्राणी आढळतात. म्हणूनच औदुबराचे झाड कधीही तोडु नये….

|| श्री गुरुदेव दत्त ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
या दोन मंत्रांचा जप त्याच्या सान्निध्यात बसून केल्यास जीवनातील भरपूर संकटाशी सामना करण्याची ताकद मिळते. तर असा हा उपयुक्त वृक्ष कधीही तोडुन टाकु नका. पावसाळ्यापुर्वी त्याचा विस्तार थोडा कमी केल्यास चालतो.

संकलन आणि पुनर्लेखन
श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी
८६६८३२९२०२

Exit mobile version