लवकरच १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार : देवेंद्र फडणवीस.केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारही बेरोजगारांना रोजगार देणार..

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर विमानतळ येथे पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेप्रमाणेच येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असून “आम्ही ठरवलंय की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या द्यायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढतो आहोत.
         आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ हजार तरुणांना रोजगार दिला जाईल असं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही रोजगार योजना राबवणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
       देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याने तरुणांमध्ये नवचैतन्य, उत्साह पाहायला मिळत आहे. मोदी सरकार आणि राज्य सरकार जणू तरुणांना दिवाळीचे गिफ्टच देणार आहे.

धनत्रयोदशी निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा.
शुभेच्छुक : पंकज मारुती पुसाळकर
प्रभाग क्रमांक ७ कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
जाहिरात…
धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)

दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version