सुरवर्धन आयोजित लतादीदी २०२४ सुगम संगीत स्पर्धेत गायत्री जोशी यशस्वी.

कसबा, संगमेश्वर येथील सौ. गायत्री कौस्तुभ जोशी यांनी ‘सुरवर्धन आयोजित लतादीदी २०२४ सुगम संगीत गायन स्पर्धेत’ तृतीय क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला आहे. गायत्री जोशी म्हणजे पूर्वाश्रमीच्या आश्विनी सुनील आपटे यांनी या स्पर्धेत ग्रुप-१ मधील (५० वर्षापर्यंतच्या) गटात ‘खेळ मांडीयेला वाळवंटी घाई …’ हा भूप,नट रागातील संत तुकाराम महाराजांचा अभंग सादर करून, ही यशस्वी कामगिरी केली आहे.
गायत्री जोशी सध्या शास्त्रीय संगीताची धडे संगीत अलंकार निहाली गद्रे यांच्याकडे, तर सुगम संगीताचे शिक्षण एस.एन.डी.टी. विद्यापीठ, पुणे येथील अभिनेत्री गात यांच्याकडून घेत आहेत. गायत्री यांची सध्या संगीत विशारद प्रथमची तयारी सुरू असून, सध्या त्या एस.एन.डी.टी. विद्यापीठ, पुणे येथे सुगम संगीत डिप्लोमाचे शिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांनी शास्त्रीय संगीत मध्यमा पूर्ण केले आहे. गायत्री जोशी सध्या देवरुख येथे नवोदित गायकांसाठी गायनाचे वर्ग घेत आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाचे त्यांच्या गुरु निहाली गद्रे आणि अभिनेत्री गात यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version