येणाऱ्या विधानसभा निवडणुक संदर्भात जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांच्या नेतृत्वात देवरूख भाजप कार्यालयात संगमेश्वर दक्षिण मंडळ तालुक्याची बैठक संपन्न.

प्रदेश सचिव महिला मोर्चा महाराष्ट्र भाजपा शिल्पा मराठे,महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा ढेकणे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणुक प्रमुख प्रमोद अधटराव , राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा निवडणुक प्रमुख राजश्री ( उल्का ) विश्वासराव, संगमेश्वर तालुका अध्यक्ष रुपेश कदम, रामदास राणे, अमित केतकर, देवरूख नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेटये, तालुका सरचिटणीस सचिन बांडागळे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रथमेश धामणस्कर,आणि सर्व मंडळ कार्यकारणी,मंडळ प्रभारी,मंडळातील मोर्चा प्रकोष्ट,आघाडी, सेलचे सर्व मंडळी,देवरूख चे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हा अध्यक्ष यांनी देवरूखची ग्रामदेवता आई सोळजाई चे दर्शन देखील घेतले. तसेच तालुक्यातील काही पदांवर नियुक्ती देखील करण्यात आल्या आहेत. जिल्हा उपाध्यक्ष संतोष केदारी तसेच सोशल मीडिया संगमेश्वर तालुका अध्यक्ष पदी सितेश पर्शराम यांची नियुक्ती झाली. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version