रत्नागिरी : भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण मंडल अध्यक्षपदी सौ. प्रियल ताई प्रशांत जोशी, यांची पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा नेते श्री बाळासाहेब माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. श्री बाळासाहेब माने,यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना “संघटना बांधणी” चा कानमंत्र दिला. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या बैठकीमध्ये सौ. जोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यानंतर पक्ष वाढीसाठी पक्ष संघटनासाठी, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी, महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी यानंतर काम करणार असल्याचे सौ. प्रियल जोशी यांनी सांगितले.
..जाहिरात…..
सौ. वर्षा ताई ढेकणे, जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा यांनी पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी समस्त भाजपा रत्नागिरी तर्फे नवनियुक्त महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौभाग्यवती प्रियल जोशी यांना शुभेच्छा दिल्या. सौ. शिल्पा ताई मराठे प्रदेश सचिव यांच्या सोबत नवनियुक्त मंडळ अध्यक्षा सौ. प्रियल ताई जोशी आणि त्यांच्या महिला कार्यकारीणीची बैठक ही पार पडली. उपस्थित मा. जिल्हाध्यक्षा, सौ ऐश्वर्या ताई जठार आणि ओबीसी जिल्हाध्यक्ष, श्री भाई जठार यांनी ही प्रियल ताईंचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीस भाजपा रत्नागिरी दक्षिण चे जिल्हाध्यक्ष श्री राजेश दादा सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ वर्षा ताई ढेकणे, प्रदेश सचिव सौ शिल्पा ताई मराठे, जिल्हा सरचिटणीस श्री सतेज नलावडे, मंडळ अध्यक्ष श्री दादा दळी, युवा जिल्हाध्यक्ष श्री हृषिकेश केळकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष श्री भाई जठार, माजी जिल्हाध्यक्षा सौ ऐश्वर्या ताई जठार, अनुसूचित जिल्हाध्यक्ष श्री संजय निवळकर, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.