भाजप व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील अनेक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या नेत्र तपासणीचा लाभ शेकडो महिलांनी घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ, डॉक्टर यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, राजन पटवर्धन, दादा ढेकणे, निलेश आखाडे, मनोर दळी, शैलेंद्र बेर्डे, राजू भाटलेकर, धनंजय मराठे, संकेत कदम , भक्ती दळी, राधा हेळेकर,सौ. सायली बेर्डे, सौ. मानसी करमरकर, भारती कुंभार, सौ. प्रणाली रायकर, सौ. सोनाली आंबेरकर, सौ. संपदा तळेकर उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवले जाणारे सर्व उपक्रम याचा लाभ नागरिकांना होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांना अपेक्षित असलेले काम रत्नागिरी भाजपाच्या माध्यमातून  होत असल्याचे ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते मामा राणे यांनी बोलताना सांगितले व भाजपा पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. 

  दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात
Exit mobile version