ग्रामपंचायत दळे परिसरातील ग्रामस्थांसाठी आधार कॅम्प चे अयोजन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,असेच कार्यक्रम अजून लावण्याची मागणी.

■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर :- ( होळी) :- तालुक्यातील ग्रामपंचायत दळे मधील ग्रामस्थांच्या मागणीनुसार ,आणि आधार अपडेट, मोबाईल लिंक व अन्य सुविधांसाठी नेहमीच खर्च करुन तालुक्याला जावे लागत आसलेने गावातील मध्यवर्ती ठिकाणी असे कॅम्प लावण्याचे मागणी ग्रामस्थांकडून होत होती.त्यानुसार
माहीती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य चे सचिव समिर शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होळी चे शिवसैनिक राजेश होळकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धकला कलासेस,बँक ऑफ महाराष्ट्र समोर, होळी स्टॉप या ठिकाणी  करण्यात आले होते, कार्यक्रमाला विभागातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक प्रभाकर खानविलकर, उदय गिरकर,श्रीकृष्ण राऊत,सतीश चव्हाण, अनिल होळकर, समीक्षा शिरवडकर,दिगंबर शिवगण,रघुनाथ महादये, अनन्या होळकर यानी मेहनत घेतली.

दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात….
Exit mobile version