दि. २५ जानेवारी २०२५ रोजी, खंडाळा वाटद येथील स्वामी कृपा आणि नवदुर्गा स्वयं सहाय्यता समूह यांचा तिळगुळ समारंभ पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सुरू झाल्यानंतर अवघ्या काही काळातच नावारूपास आलेल्या या दोन समूहांनी “सन्मान स्त्रीशक्तीचा” या धर्तीवर तिळगुळ समारंभाचे आयोजन केले होते.
प्रत्येक वयातील स्त्री ही शक्ती स्वरूप मानून, ह्या तिळगुळ समारंभामध्ये खंडाळा वाटद येथील लहान मुली ते वयोवृध्द महिला या सर्वांनाच वाण देऊन गौरवण्यात आले. जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, खंडाळ्यातील महिला व्यवसायिक, गृहिणी आदी निमंत्रित पाहुण्यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला. “सक्षम सखी, सक्षम समूह” ह्या ब्रीद वाक्याप्रमाणेच अशा विविध कार्यक्रमांमधून स्त्री सन्मानासोबतच “स्त्री सशक्त” होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे समूहाच्या सचिव वर्षा राजे निंबाळकर म्हणाल्या.
समूहातील प्रत्येक सखीने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपले योगदान दिले. सदर कार्यक्रम सौ. प्राजक्ता रेवाळे यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. या प्रसंगी स्वामी कृपा स्वयं सहाय्यता समूह सौ. प्राजक्ता प्रभाकर रेवाळे – अध्यक्षा, पायल महेश शिगवण – उपध्यक्षा, वर्षा राजेंद्र निंबाळकर – सचिव, रोहिणी विजय शितप – लेखापाल, सुवर्णा सुरेश मयंगडे, सुनिता सूर्यकांत वासावे, जयश्री देवराम पालशेतकर, शुभांगी जनार्दन मांजरेकर, अनुष्का आनंद झगडे, श्रुती श्रीधर ठोंबरे तर नवदुर्गा स्वयं सहाय्यता समूहाच्या शितल संतोष खेडेकर – अध्यक्ष, रागिणी राजेंद्र निंबाळकर – उपाध्यक्ष, अंकिता संदेश निंबरे – सचिव, सारिका जनार्दन मांजरेकर – लेखापाल ऋणाली सुरेश मायंगडे, पल्लवी निशांत नांदिवडेकर, सिद्दी सुरेश काताळे, प्रणिता प्रदीप कांबळे, पूजा यशवंत वीर, सुमित्रा पांडुरंग गोंधळी आदी महिलांसह रचना धामणस्कर, हर्षा पवार उपस्थित होत्या.
