जि. प. प्राथमिक आदर्श शाळा भडे नं 1 मध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठया उत्सहात संपन्न…

सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळेत शिक्षण, क्रीडा,वक्तृत्व, गायन, वादन व व्यक्तिमत्व विकास असे विविध उपक्रम विशेष राबविवले जातात..

लांजा : तालुक्यातील आदर्श शाळा भडे नंबर 1 मध्ये दिनांक 26/01/2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे  आयोजित करण्यात आले होते . मुलांमधल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दैनंदिन अभ्यास क्रमाबरोबर विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले जातात. शाळेत सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षण, क्रीडा, वक्तृत्व गायन, वादन, संगणक प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास असे विविध उपक्रम राबवले जातात.
      त्यापैकी विद्यार्थी यांच्या अंगी असणाऱ्या नृत्य, नाट्य व गायन या कलांना उत्स्फूर्त वाव देणारा उपक्रम म्हणजे विविध गुणदर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम जि. प आदर्श शाळा भडे नं 1 च्या रंगमंच्यावर पार पडला.
    सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ‘गणेशाला वंदन’ करून करण्यात आली. शालेय मुलांना त्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळतो पण चिमुकल्यांना वाव मिळत नाही हीच बाब भडे शाळेतील शिक्षकांनी हेरली आणि माझ्या पप्पानी गमपती आणला या गाण्यासह अंगणवाडीतील बालचमुंचीही ठेका धरायला लावणारी गाणी यावेळी सादर केली. कार्यक्रमाला रंग चढत असताना भारूड लोककलेतील  “कुंकू घ्या कोणी काळं मणी ” या नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांमधून बक्षीससांचा वर्षाव देखील करण्यात आला. पांडुरंग आणि भक्त यातील भक्तीचे अतूट नाते सांगणारी “संगीतसंत सखू “ही नाटीका सादर करून प्रेक्षकांना भक्तीत विलीन केले.शेवटपर्यंत प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवणारा बहारदार असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम भडे नं 3 च्या रंगमंच्यावर पार पडला.
     या कार्यक्रमास मा. श्रीम. सरपंच संजना बंडबे मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मा.श्रीम.आडविलकर मॅडम,  भडे पोलीस पाटील श्री प्रशांत बोरकर, मुख्याध्यापक श्री.कुड सर, सहायक शिक्षक श्री.माने सर,श्रीम दळी मॅडम, श्री खुटाळे सर, माजी सरपंच श्री संजीवकुमार राऊत,ग्रामस्थ बबन काका तेंडुलकर,श्री राजूदादा लिंगायत, जि. प आदर्श शाळा भडे नं 3 चे मुख्याध्यापक श्री माने सर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
                          
  दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..
Exit mobile version