परिवहन मंडळाच्या ग्रामपंचायत भागामध्ये रात्रीच्या वस्तीसाठी थांबणा-या एसटी बसेसच्या चालक- वाहकांच्यासाठी विश्रांतीगृह होण्यासाठी जिल्ह्याच्या विशेष नियोजन मंडळाकडून आर्थिक तरतूद व्हावी : भाजपने केली मागणी..

वस्तीच्या बसेसचे चालक – वाहकांना वाहनामध्येच झोपावे लागते. दैनंदिन विधीसाठीही गैरसोय होत असते. विशेषत: पावसाळ्यामध्ये तर चालक वाहकांची अतोनात गैरसोय होत असते याची सर्वांनाच कल्पना आहे. तथापि बसेसच्या चालक – वाहकांची अशी सोय झाल्यास त्यांनाही पुरेशी शारिरिक आणि मानसिक विश्रांती मिळणे शक्य होणार आहे असे निदर्शनास आले आहे. हा उपक्रम चांगला असला तरीही रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वच ग्रामपंचायतीना स्वत:च्या फंडातून असा खर्च करणे शक्य होणारे नाही. तथापि ग्रामीण भागासाठी अशा प्रकारची योजना झाल्यास तो एक प्रकारे विकासच होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर ग्रामपंचायतीने रात्रीच्या वस्तीसाठी थांबणा-या एसटी बसेसच्या चालक – वाहकांच्यासाठी स्वत:च्या फंडातून विशेष अतिथीगृहाचे (विश्रांती स्थानाचे) बांधकाम केले आहे. त्याच धर्तीवर सर्वत्र असे विश्रांतीगृह बांधावे. आम्ही या निवेदनाद्वारे अशी मागणी करीत आहोत की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये रात्रीच्या वस्तीसाठी परिवहन मंडळाच्या एसटी बसेस ना थांबावे लागते. त्या बसेसच्या चालक आणि वाहकांसाठी विशेष अतिथीगृहाचे (विश्रांती स्थानाचे) बांधकाम करण्यासाठी इच्छुक ग्रामपंचायतीना जिल्हा नियोजन मंडळाकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करण्यात यावी असा ठराव जिल्हा नियोजन मंडळाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणा-या सभेपुढे ठेवण्यात यावा आणि त्यास मंजुरी मिळावी आणि इच्छुक ग्रामपंचायतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती उपाय योजना करण्यात यावी. तसेच इच्छुक ग्रामपंचायतींकडून तसे प्रस्ताव मागवून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित ग्रामविकास विभागामार्फत प्रयत्न करण्यासही योग्य ते निर्देश करण्यात यावेत. निधीची तरतूद केल्यास ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव नक्कीच येतील यासाठीच सर्वप्रथम जिल्हा नियोजन मधून निधीची तरतूद करण्यात यावी अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केली यावेळी महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, महिला जिल्हा सरचिटणीस मुळे, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला मोर्चा शहराध्यक्ष पल्लवीताई पाटील, दादा ढेकणे, निलेश आखाडे, मंदार खंडकर, राधा हेळेकर, सानिका शर्मा, भारती कुंभार आदी उपस्थित होते.

जाहिरात..

दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version