माहिती अधिकार कार्यकर्त्यांची महिला सरपंचाशी असभ्य वर्तन; भाजपा कार्यकर्ते व संगमेश्वर तालुका सरपंच संघटना आक्रमक.

मनोहर गुरव आणि सुनिल करंडे यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल.

                  भाजपा सदस्या आणि घोडवली सरपंच सौ. वैदेही वैभव बने यांच्या तक्रारीमधे उल्लेख केल्या नुसार ग्रामपंचायत मधे बैठक चालू असताना त्या ठिकाणी घोडवली गावचे ग्रामस्थ नसलेले मनोहर गुरव व सुनील करंडे हे उपस्थित झाले व सदर बैठकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करताना मोबाईल द्वारे शूटिंग करत अरेरावी ची भाषा करत भांडणास सुरुवात केली. आणि सरपंच सौ वैदेही बने यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला दाखवतो अशा धमक्या दिल्या. तसेच उपस्थित ग्रामस्थासमोर असभ्य भाषेत टीका टिप्पणी केली.
यावर आज संगमेश्वर तालुका भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुका सरपंच संघटना आक्रमक होत. देवरुख पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट घेत तक्रार दाखल केली.

Exit mobile version