भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ६  तिळगुळ समारंभ व मोफत नेत्रतपासणी शिबिरास चांगला प्रतिसाद.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ६ मध्ये तिळगुळ समारंभाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. तसेच सर्वांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर्याचे आयोजन इंफिगो व भाजप यांच्या विद्यमाने करण्यात आले होते.
             शेकडो लोकांनी मोफत नेत्रतपासणी शिबिराचा लाभ घेतला. तिळगुळ समारंभाचे आयोजन महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष सौ. प्राजक्ता रूमडे, युवा मोर्चा पदाधिकारी सौ. निधी निलेश आखाडे यांनी केले होते. परिसरातील अडीचशे महिलांनी हळदीकुंकू समारंभाला उपस्थिती दाखवली.
              या दोन्ही कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, प्रदेश पदाधिकारी शिल्पाताई मराठे, भक्ती दळी, शोनाली आंबेकर, माजी नगरसेविका रसाळ मॅडम, महिला शहर अध्यक्षा पल्लवी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, निलेश आखाडे,सौ. प्रियल जोशी , दादा ढेकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र 

Exit mobile version